यवतमाळ: नवी मुंबईच्या विमानतळ नामकरणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला नवी मुंबईचा इतिहास माहिती आहे, नवी मुंबईची निर्मितीच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केली आहे. त्यामुळे वसंतराव नाईक यांचे नाव नवी मुंबईच्या विमानतळाला देण्यात यावे, तसेच तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्याची मागणी भाजपचे आमदार निलय नाईक यांनी केली आहे.
'नवी मुंबई स्थापनेत मोलाचे योगदान'
'नवी मुंबई निर्मितीसाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनीच नवी मुंबईची निर्मिती केली आहे. त्यांनी नवी मुंबईचा इतर विकास केला होता. या विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे अशी मागणी करावी लागत आहे, हे आमचे दुर्दैव आहे. नवी मुंबईच्या विकासासाठी पश्चिम बंगाल वरून क्रेन आणून ब्रिज व इतर विकास त्यांनी केला आहे. म्हणूनच या विमानतळाला त्यांचे नाव देण्याचा विचार शासनानेच करायला हवा होता. त्यासाठी राज्य सरकारने एक प्रस्ताव दिल्लीला पाठविला पाहिजे', असे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू व भाजपचे आमदार निलय नाईक म्हणाले आहेत.
हेही वाचा -नवी मुंबई विमानतळ नामकरण : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिडको भवनासमोर मोठा फौजफाटा तैनात