यवतमाळ :अल्पवयीन मुलीचे शोषण करून तिने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमधून उघडकीस आला ( Minor Girl Deliver New Born in Yavatmal ) आहे. आरोपी युवकाने १ मार्च २०२२ ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत शोषण केले. त्यामुळे पीडिता गर्भवती राहून तिने बाळाला जन्म दिला. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला ( Minor Girl Deliver Baby In Yavatmal ) आहे.
Minor Girl Deliver Baby : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीचे शोषण; मुलीने दिला बाळाला जन्म - Minor Girl Deliver New Born in Yavatmal
यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला ( Minor Girl Deliver Baby In Yavatmal ) आहे. त्या प्रकरणी आरोपी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचे युवकाशी प्रेमसंबंध होते. मात्र तिचा गैरफायदा घेण्यात आल्याचे कुटूंबीयांकडून सांगण्यात आले आहे.
![Minor Girl Deliver Baby : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीचे शोषण; मुलीने दिला बाळाला जन्म Minor Girl Deliver Baby](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17201716-thumbnail-3x2-fbgn.jpg)
पीडितेचे युवकाशी प्रेमसंबंध : निकेश शेषराव उईके (२३) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पीडितेचे युवकाशी प्रेमसंबंध होते. ही बाब पीडितेच्या आईला मोठ्या मुलीकडून चार महिन्यांपूर्वी कळाली. त्यानंतर पीडितेला जाब विचारून बोलणे बंद करण्यास सांगितले. त्यावर पीडितेने यानंतर युवकाशी बोलणार नाही, असे सांगितले. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबातील सर्वजण आपआपल्या कामावर जात होते. पीडिता एकटीच घरी राहत होती. पीडिता सदृढ असल्याने व घरगुती सर्व कामे करीत असल्याने कुटुंबाला पीडिता गर्भवती असल्याचे लक्षात आले नाही. पीडितेची आई ८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी कामावर निघून गेली. दुपारी चार वाजता भावजईने फोन केल्यानंतर ही बाब उघड झाली.
युवकाविरोधात गुन्ह्याची नोंद : फिर्यादी कामावरून पाच वाजताच घरी आली. त्यावेळी मुलगी घरी दिसून आली नाही. आजूबाजूला विचारपूस केली असता मुलीचा शोध लागला नाही. मोठ्या मुलीने निकेश उईके याच्या घरी गेली असावी म्हणून वंजारी फैल गाठले. यावेळी निकेशची बहिण हजर होती. तिने सांगितले की, पीडितेची प्रसूती झाली असून, तिने बाळाला जन्म दिला आहे. पीडित मुलीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेऊन गेले असल्याचे सांगितले. युवकाने मैत्री करून मुलीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित ( Trap Of Love ) केले. त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली व प्रसुतीही झाली. पीडिता अल्पवयीन असून, तिला समज नसल्याने तिच्या साधेपणाचा फायदा निकेशने ( Exploitation Of Minor Girl ) घेतला. त्यामुळे गुन्हा दाखल करावा, अशी तक्रारी शहर पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी युवकाविरोधात कलम ३७६, ३७६ (२), (जे), (एन) भादंवि सहकलम ४, ६ पोक्सोप्रमाणे गुन्हा नोंद केला.