महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वनमंत्री राठोड करणार का पोहरादेवीमध्ये आरोपाची खंडन.?

पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर नॉटरिचेबल असलेले वन मंत्री संजय राठोड मंगळवारी (दि. 23 फेब्रुवारी) वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दर्शनासाठी येत असल्याचा त्यांच्या अधिकृत दौऱ्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

मंत्री राठोड यांचे घर
मंत्री राठोड यांचे घर

By

Published : Feb 23, 2021, 4:07 AM IST

यवतमाळ -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणांमध्ये वन मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहे. अशातच सोमवारी (दि. 22) मंत्री राठोड हे यवतमाळमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, त्यांच्या निवासस्थानातून एकही वाहन बाहेर पडले नाही. ते मंगळवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दौरा आहे. त्यावेळी ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत बोलतील का, याकडे सर्वांचे लक्ष झाले आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

वनमंत्री राठोड यांचा शासकीय दौरा

मंत्री संजय राठोड हे मंगळवारी (दि. 23) सकाळी नऊ वाजता आपल्या निवासस्थानाहून वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीसाठी निघणार आहे. जवळपास साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पोहरादेवी येथे पोहोचणार आहेत. या दरम्यान त्यांच्या समर्थकाकडून मार्गदरम्यान त्यांचे स्वागत करण्यात येत असल्याचे माहिती समोर येत आहे. पोहरादेवी येथे महंत यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर आपल्यावर झालेल्या आरोपाचेही खंडन मिडियासमोर करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यानंतर यवतमाळ येथे दुपारी चार वाजण्याच्या सुमाराला जिल्हाधिकारी कार्यालयात विविध अधिकाऱ्यांशी कोरोनाबाबात आढावा बैठक घेणार आहेत.

हेही वाचा -वनमंत्री संजय राठोड आज यवतमाळला येणार?

ABOUT THE AUTHOR

...view details