यवतमाळ- एमएच 29 हेल्पिंग हँड्स टीमने दिले धामन जातीच्या सापाला जीवनदान दिले आहे. दुपारच्या सुमारास किन्ही या गावावरून या टीमच्या हेल्पलाईन नंबरला साप दिसला असल्याची माहिती मिळाली होती.
'एमएच 29 हेल्पिंग हँड्स' टीमने दिले धामन जातीच्या सापाला जीवनदान
जखम बरी झाल्यानंतर धामन जातींच्या सापाला निसर्गमुक्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
याची तातडीने दखल घेत संस्थेचे निलेश मेश्राम आणि करन मून हे घटनास्थळी पोहचले. त्या जखमी धामन जातीच्या बिन विषारी सापला मोठ्या शिताफिने पकडून यवतमाळ येथे संस्थेच्या कार्यालय परिसरामध्ये आणले. यानंतर या टीमच्या सदस्यांनी सापाची पाहणी केली असता, त्या सापाच्या गळ्यात मच्छी पकडण्याचा गळ अडकलेला आढळून आला. याची माहिती वनविभागचे कार्यरत कर्मचारी निलेश मोटे यांना देण्यात आली. वनविभाग कार्यालयाने तात्काळ रितसर पत्र देऊन पशुवैधकीय रुग्णालय यवतमाळ येथे उपचारासाठी नेण्यासाठी मंजुरी दिली. मात्र, पशु वैद्यकीय अधिकारी दौऱ्यावर असल्याने तो साप जीवंतर राहील याची शास्वती नव्हती. त्यामुळे या संस्थेचे उपाध्यक्ष निलेश मेश्राम यानी स्वतः त्या धामन सापाच्या गळ्यातील गळ काढण्याचा निर्णय घेतला आणि वन विभाग कर्मचाऱयांच्या समोर तो गळ काढण्यात आला.
त्यानंतर जखम स्वच्छ करून त्यात हळद भरून पट्टी बांधण्यात आली. जखम बरी झाल्यानंतर धामन जातींच्या सापाला निसर्गमुक्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी एमएच 29 हेल्पिंग हैंड्स संस्थेचे करन मून, अजय गुप्ता, चिट्टी आड़े, दर्शन सोनकुसरे, जेतानंद सूर्यवंशी, आश्विन सहारे, प्रतिक कासार, पवन धोरे, सौरभ डोंगरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.