महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिमचे तापमान ४० अंशांवर, रस्त्यांवर शुकशुकाट - उन्हाळा

जानेवारीच्या सुरुवातीला उन्हाची तीव्रता कमी जाणवत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने चांगलाच उन्हाळा जाणवू लागला आहे

वाशिम तापमान

By

Published : Mar 30, 2019, 5:08 PM IST

वाशिम- मार्च महिन्याच्या सुरुवातीला मध्यावर असलेला तापमाणाचा पारा अता कमालीचा वाढला आहे. सध्या जिल्ह्यातील तापमान ४० अंशावर पोहोचले असून रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.

शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात तापमानाचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. अशा वातावरणात वाढलेल्या तापमानाने नागरिकांच्या जीवांची लाही लाही होत आहे. त्यामुळे शीतपेयांच्या दुकानांवर नागरिक मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.


जानेवारीच्या सुरुवातीला उन्हाची तीव्रता कमी जाणवत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने चांगलाच उन्हाळा जाणवू लागला आहे. शहरातील गर्दीने ओसंडून वाहणारे रस्तेही ओस पडले आहेत. उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून नागरिक संध्याकाळी घराबाहेर पडणे पसंत करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details