यवतमाळ - नागपूर-तुळजापूर महामार्गावरील कोसदनी घाटात मारुती अल्टो व बोलेरोची समोरासमोर धडक झाल्याने १ ठार आणि ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री १ वाजता घडली.
निवडणूक कर्तव्यावरुन परतताना अपघात; १ ठार, ३ गंभीर
घाटंजी येथील कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांची पुसद येथे निवडणुकीकरीता निवड करण्यात आली होती. निवडणुकीचे कर्तव्य पार पाडून पुसद ते घाटंजी या मार्गावर ते आपल्या अल्टोने जात होते. दरम्यान, कोसदनी घाटात विरूद्ध दिशेने तुळजापूरला जाणाऱ्या बोलेरोला समोरासमोर धडक झाली.
घाटंजी येथील कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांची पुसद येथे निवडणुकीकरीता निवड करण्यात आली होती. निवडणुकीचे कर्तव्य पार पाडून पुसद ते घाटंजी या मार्गावर ते आपल्या अल्टोने (एमएच २९ आर १९३१) जात होते. दरम्यान, कोसदनी घाटात विरूद्ध दिशेने तुळजापूरला जाणाऱ्या बोलेरोला (एमएच २९ बीई ०४८०) समोरासमोर धडक झाली.
यामध्ये अल्टोमधील कृषी विभागाचे कर्मचारी विकास गुटे (४२) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गणेश तंबाखे (४२), कल्याण बेदरकर (४३), कृष्णा भागवत (४४) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम आर्णी व नंतर यवतमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.