यवतमाळ -जिल्ह्यामधील मारेगाव तालुक्यात एका 26 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गावातीलच एका तरुणाने अत्याचार केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. गणेश धनराज भोयर (24) असे या आरोपीचे नाव आहे.
यवतमाळमध्ये विवाहित महिलेवर अत्याचार... हेही वाचा... आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस उपायुक्ताने गायले राष्ट्रगीत!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा युवक विवाहितेच्या घरासमोर राहतो. महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार युवक नेहमी महिलेसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असे. परंतु मागील 15 दिवसापासून युवकाने महिलेला, आपण प्रेम करत असल्याचे सांगितले. मात्र, तिने त्याला याबाबत नकार दिला होता.
हेही वाचा.... नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यभर निदर्शने, सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांचा सहभाग
एके दिवशी महिला आपल्या कामानिमित्त पतीसोबत मारेगावला आली होती. यावेळी महिलेला सोडून पती घरी माघारी परतल्यावर युवकाने तिचा रस्ता अडवला. आपल्याला काहीतरी बोलायचे आहे, असे तिला सांगितले. आपल्या सोबत न बोलल्यास जीव देण्याची धमकी दिली. यानंतर त्याने तिला आपल्या गाडीवर बसवून एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर अत्याचार केले. ही महिला जेव्हा घरी आली, तेव्हा तिने घडलेला सगळा प्रकार पतीला सांगितला. तसेच मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली. आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन्स ट्रॅक करून पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी करीत आहेत.
हेही वाचा.... VIDEO: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विरोधीपक्षाला टोलेबाजी...