यवतमाळ -सध्या कोरोनामुळे लग्न समारंभाव विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. तरी काही जण निर्बंध पाळत लग्न उरकत आहेत. 'चट मंगनी पट् ब्याह' या हिंदीतील म्हणीची प्रचिती औरंगाबाद येथे पहायला मिळाली. यवतमाळ जिल्ह्यातील मुलगी मुलाचे घर पाहण्यासाठी गेली अन् त्याच कार्यक्रमात साखरपुडा अन् लग्न उरकून घेतले आहे.
पसंतीसह दोन तासांतच आटोपले लग्न - yavatmal district news
यवतमाळ जिल्ह्यातील पूसद येथील धनश्री दमकुंडवार व औरंगाबाद येथील वैभव येरावार यांनी पाहण्याच्या कार्यक्रमातच साखरपुडा व लग्न उरकले आहे. यामुळे त्यांचे कोतुक केले जात आहे.
पुसद येथील धनश्री दमकुंडवार व औरंगाबाद येथील वैभव येरावार असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभावर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. लग्न केवळ 25 जणांच्याच उपस्थित व्हावा, सर्वांनी कोरोना चाचणी केलेली असावी, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, यांसह विविध नियम लावण्यात आले आहेत. मात्र, यातून मार्ग काढत या नवदाम्पत्यांनी एक अनोखा विवाह केला आहे. पुसद येथील प्रसांत दमकुंडवार हे मुलीला घेऊन औरंगाबाद येथेल गेले होते. त्या ठिकाणी पसंती, साखरपुडा अन् आठ-दहा जणांच्या साक्षीने त्याच ठिकणी लग्न उरकले. धनश्री व वैभव यांचा विवाह साधेपणाने हरी-कृपा नगर, सिडको औरंगाबाद येथे पार पडला. त्यांच्या या विवाहाचे कौतुक होत आहे.
हेही वाचा -यवतमाळमध्ये लहान मुलांसह म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी वेगळ्या वॉर्डाचे नियोजन