यवतमाळ- मारेगाव शहरासह तालुक्यातील काही गावात गॅस्ट्रोची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक रुग्ण मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, गॅस्ट्रो झालेल्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना गॅस्ट्रोची लागण कशामुळे झाली याचे कारण अद्याप समोर आले नाही.
मारेगाव तालुक्यातील काही गावात गॅस्ट्रोची लागण झाल्याने रुग्णांना हगवण, उलटी आणि मळमळ होत असल्याची लक्षणे दिसताच गावावातील नागरिक तत्काळ रुग्णालयात दाखल झाले. या ठिकाणी मागील 4 ते 5 दिवसांपासून रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील अनिल व्हराटे, सिंधू श्रावण किन्हेकर, साधना राऊत, मेघा नगराळे, मंगला वरटकर, रजिया शेख गुलाब, सुशीला आत्राम, प्रमिला आत्राम, रेखा आत्राम (भालेवाडी), मंदा डवरे (गोदनी), इंदिरा लोहकरे (टाकरखेडा), विनोद आत्राम (भालेवाडी) यासह ईतर रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.