यवतमाळ - वाशिम लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात ११ तारखेला मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार सुरू झाला आहे. आज वाशिम जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माणिकराव ठाकरे वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रचाराला आले होते.
गवळींची लढाई वंचित बहुजनसोबत की माझ्या सोबत त्यांनाच विचारा- माणिकराव ठाकरे - यवतमाळ
वाशिम लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार सुरू झाला आहे. आज वाशिम जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माणिकराव ठाकरे मतदारसंघात प्रचाराला आले होते.

यावेळी शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळींसोबत आपली लढाई कशी असणार? असा प्रश्न ठाकरे यांना विचारला असता, त्यांनी जनता काँग्रेसच्या पाठीमागे आहे आणि जनतेला विश्वास आहे काँग्रेसपक्ष जे सांगतोय ते करून दाखवतो. त्यामुळे सर्व वातावरण आमच्या बाजूने असल्याचेही त्यांनी सांगितले.
भावना गवळी यांनी आमची लढत बहुजन वंचित आघाडी सोबत असल्याचे व्यक्तव्य केलं होते. त्यासंदर्भात विचारले असता, माणिकराव ठाकरे यांनी हा प्रश्न भावना गवळी यांनाच विचारा. त्यांना काय वाटते, असे मिश्कील उत्तर माणिकराव ठाकरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिले.