यवतमाळ-काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलाआहे. राष्ट्रवादीचे आमदार मनोहर नाईक, आमदार ख्वाजा बेग, संदीप बाजोरिया यांच्या उपस्थितीत अर्जदाखल केल्यानंतर ठाकरे यांनी आघाडीच्या मेळाव्याला संबोधित केले. त्यानंतर यवतमाळच्या केदारेश्वर महादेव मंदिरात जाऊन माणिकराव ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला.
माणिकराव ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल - माणिकराव
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेस पक्षाकडून माणिकराव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
आघाडीची एकजूट असल्याने माझा विजय निश्चित असल्याची आशा त्यांनी यावेळीव्यक्त केली. तर भावना गवळी यांच्या उत्तराला प्रतिउत्तर देण्याचे टाळत डायव्हर्ट राजकारण कोण करत हे आपणास कळलेपाहिजे असेत्यांनी सांगितले. मागील पाच वर्षात शासनाने शेतकऱ्यांना सामान्य जनतेला दिलेल्याकुठल्याच आश्वासनांचीपूर्तताकेलेलीनाही. त्यामुळे जनताशासनावर नाराज आहेआणि येत्या निवडणुकीत जनता आपल्या मत रूपाने दाखवून देईन. असेही ठाकरे यांनी सांगितले.
केंद्रात व राज्यात भाजप सरकार असून देखील दिलेल्या एका आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा दबावात काम करत आहेत. देशाचे संविधान बदलण्याचे कामहे शासन काम करीत आहेत. त्यामुळे या शासनाला पायउतार करून काँग्रेसरुपी शासन आणून सामान्य जनतेला दिलासा, द्यावी अशीप्रतिक्रिया माणिकराव ठाकरे यांनी दिली.