महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेचे सरकार स्थापन न झाल्याने शिवसैनिकाने स्वतःवरच केले ब्लेडने वार - ramesh jadhao attemped suicide in digras

रमेश हे काही कामानिमित्त दिग्रस येथे आले असताना राज्यात शिवसेनेऐवजी भाजपचे सरकार स्थापन झाल्याची बातमी त्यांना कळाली. या घटनेचा धक्का सहन न झाल्याने त्यांनी मानोरा चौकात स्वतःवर ब्लेडने वार करायला सुरवात केली. ही बाब तिथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक हवालदार युवराज चव्हाण यांच्या लक्षात येताच, त्यांनी डिबी पथकाच्या मदतीने रमेश यांना ताब्यात घेतले.

रमेश बाळू जाधव

By

Published : Nov 24, 2019, 5:58 PM IST

यवतमाळ -शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करतील असे चित्र असताना अचानक भाजपने सरकार स्थापन केले. यामुळे उद्विग्न झालेल्या एका शिवसैनिकाने स्वतःला ब्लेड मारून जखमी केल्याची घटना दिग्रस येथील मानोरा चौकात घडली आहे. रमेश बाळू जाधव (वय ४५ रा. उमरी खुर्द), असे या व्यक्तीचे नाव आहे.

रमेश हे काही कामानिमित्त दिग्रस येथे आले असताना राज्यात शिवसेने ऐवजी भाजपचे सरकार स्थापन झाल्याची बातमी त्यांना कळाली. या घटनेचा धक्का सहन न झाल्याने त्यांनी मानोरा चौकात स्वतःवर ब्लेडने वार करायला सुरवात केली. ही बाब तिथे कर्तव्यावर असलेल्या वाहतुक हवालदार युवराज चव्हाण यांच्या लक्षात येताच, त्यांनी डिबी पथकाच्या मदतीने रमेश यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील ब्लेड जप्त करून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा -पालघर : शिवसैनिकांकडून भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निदर्शने

राज्यात आलेल्या राजकीय भूकंपाचे पडसाद सामान्य जनतेतही उमटायला लागल्याचे या घटनेमुळे अधोरेखीत झाले आहे. घडलेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळासाठी एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, रमेश यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details