यवतमाळ -राज्यात सत्तास्थापनेचा पेच वाढतच चालला आहे. विविध पक्षांच्या नेत्यांप्रमाणेच महाराष्ट्राच्या जनतेलाही याबाबतची उत्सुकता लागून आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी आई तुळजाभवानीला साकडे घालण्यासाठी एक शिवसैनिक यवतमाळ ते तुळजापूर सायकल प्रवास करणार आहे. गिरीश व्यास असे या शिवसैनिकाचे नाव आहे.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा...तुळजाभवानीला साकडे घालण्यासाठी शिवसैनिकाची सायकल वारी - गिरीश व्यास यवतमाळ
महाराष्ट्रावर भगवा फडकवा ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पुर्ण व्हावी यासाठी गिरीश व्यास आई तुळजाभवानीला साकडे घालणार आहेत. यवतमाळ ते तुळजापूर असे 400 किलोमीटरचे अंतर गिरीश व्यास सायकलवरून पूर्ण करतील. प्रवासाच्या मार्गातील गावांमध्ये ते स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची भेटदेखील घेणार आहेत.
हेही वाचा -मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; शिवसैनिकांना विश्वास
महाराष्ट्रावर भगवा फडकावा, अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पुर्ण व्हावी यासाठी गिरीश व्यास आई तुळजाभवानीला साकडे घालणार आहेत. आज(20 नोव्हेंबर) राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यास यांच्या सायकल यात्रेला भगवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी राठोड यांनी 1100 रुपये व्यास यांना भेट म्हणून दिले. यवतमाळ ते तुळजापूर असे 400 किलोमीटरचे अंतर गिरीश व्यास सायकलवरून पूर्ण करतील. प्रवासाच्या मार्गातील गावांमध्ये ते स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची भेटदेखील घेणार आहेत.