यवतमाळ -दिग्रस पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मेंढी येथील शेत शिवारात डोक्यात वार करून तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कृष्णा परशराम उकंडे (वय २२ रा. डोळंबावाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
प्रेम प्रकरणातून तरुणाचा डोक्यात वार करून खून - कृष्णा परशराम उकंडे
दिग्रस पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मेंढी येथील शेत शिवारात डोक्यात वार करून तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कृष्णा परशराम उकंडे (वय २२ रा. डोळंबावाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
घटनेची माहिती मेंढी येथील पोलीस पाटील यांनी दिग्रस पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत कृष्णा उकंडे हा कामानिमित्त मुंबईत रहायचा. मात्र, रक्षाबंधनसाठी तो दोन दिवसांपूर्वी आपल्या गावी आला होता. कृष्णाचे एका मुलीसोबत प्रेम प्रकरण असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यातून ही हत्या झाल्याचे समोर येत आहे.
याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी तक्रारदार गुलाब बुचके यांच्या तक्रारीवरून आरोपी संतोष दौलत डहाके याच्यावर गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, सहायक पोलीस निरीक्षक विनायक जाधवसह करत आहेत.