यवतमाळ- जिल्ह्यातील राळेगाव तालुका हा आदिवासी बहुलभाग आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे उद्योग नसून बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहे. मात्र, पारंपरिक पिकांना फाटा देत येथील युवा शेतकरी सुमित राऊत यांनी आपल्या शेतात कोरफडचे पीक घेतले. इतकेच नव्हेतर त्यापासून ज्यूस तयार करण्यासाठी छोटी कंपनीही सुरू केली.
कोरफड पिकांची लागवड करून युवकाने उभारली स्वतःची कंपनी हेही वाचा-७० वर्षात देश विकला असं म्हणणाऱ्यांनीच देश विकायला काढला, धनंजय मुंडेंचा निशाणा
सुमित याने एमटेक पर्यत शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु, त्याला आपल्या भागात लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने राळेगाव येथे एखादा उद्योग सुरू करावा, अशी त्याची इच्छा शिक्षण घेतानाच होती, त्याने ती पूर्ण केली. त्याला कोरफड पिकांची कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. परंतु, त्याने मागे पुढे न पाहता कोरफड पिकाचे कुठे उत्पन्न होते त्याठिकाणी जाऊन त्याने प्रक्षिशन घेतले. त्यानंतर कोरफड पिकांचे ज्यूस तयार कसे करायचे यांचे प्रशिक्षण जयपूर येथे घेतले.
परंतु, हे सर्व झाल्यावर त्याने गावातील लोकांना कोरफड पीक लागवडीसाठी तयार केले. परंतु, कोणीही कोरफड पिकाची लागवड केली नाही. यावर तो निराश झाला नाही, तर स्वतःच्या शेतात कोरफड पिकांची लागवड केली. त्यापासून तो ज्यूस तयार करून उत्पन्न मिळवत आहे. एखाद्या लागवड केलेल्या कोरफड पिकापासून पाच वेळा उत्पन्न मिळते. त्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी सुध्दा आहे. आज त्याच्या स्वतःचा कंपनीत तयार झालेले प्रोडक्ट राज्यभर विक्रीसाठी जात आहे.
कोरफडीच्या उद्योगातून अनेक युवकांना सुमितने रोजगार उपलब्ध करून दिल्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी एका पिकांच्या मागे न लागता कोरफडचे पीक घेऊन उत्पन्न वाढवावे, असे आव्हान त्याने शेतकरी वर्गाला केले आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे कोरफडचे पीक असल्याचे त्याने यावेळी सांगितले.