महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुसदमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 38 लाखांचा मुद्देमाल केला जप्त - Crime Branch action in Pusad in Yavatmal district

जांब बाजार येथे एका गोडाऊनवर धाड टाकून तब्बल ३३ लाखांचा गुटखा व वाहन असा ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुसद ग्रामीण पोलीस गुन्हे शाखेने केली आहे.

पुसद गुन्हे शाखेच्या कारवाईत 33 लाखांचा गुटखा जप्त
पुसद गुन्हे शाखेच्या कारवाईत 33 लाखांचा गुटखा जप्त

By

Published : Jul 16, 2021, 7:41 PM IST

यवतमाळ - येथील जांब बाजार येथे एका गोडाऊनवर धाड टाकून तब्बल ३३ लाखांचा गुटखा व वाहन असा ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुसद ग्रामीण पोलीस गुन्हे शाखेने केली आहे. येथील पोलिसांना जाम बाजार परिसरातील एका गोडाऊनमध्ये अवैधरित्या गुठक्याचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

जांब बाजार येथे एका गोडाऊनवर धाड टाकून तब्बल ३३ लाखांचा गुटखा व वाहन असा ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात उडाली खळबळ

या कारवाईत 32 लाख 99 हजार 900 रूपयांची सुगंधीत तंबाखू, अवैद्य गुटका तसेच, पाच लाखांचे वाहन असा एकूण 37 लाख 99 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी शेख आतिक शेख मोईन, ताहेर अहमद मोबीन अहमद या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शेख तारिक शेख मोईन फरार झाला आहे. पुसदमध्ये एलसीबीने केलेल्या या कारवाईमुळे यवतमाळ जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details