यवतमाळ - विश्वशांती एज्युकेशन संस्था, वुयुरु मंडल विजयवाडा येथे देशभरातील विविध ठिकाणाहून जवळपास ४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु सुट्टीच्या काळातच कोरोनाचा उद्रेक झाला आणि त्यामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे बहुतांश विद्यार्थी येथेच अडकून पडले आहेत. यात महाराष्ट्राच्याही विद्यार्थ्यांचा समावेश असून मागील दीड महिन्यांपासून हे विद्यार्थी येथे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी महाराष्ट्र सरकारकडे आपल्याला परत घेऊन जाण्याची मागणी केली आहे.
विजयवाडा येथील विश्वशांती एज्युकेशन संस्था येथे महाराष्ट्रातील 18 विद्यार्थी आणि पाच पालक अडकले... हेही वाचा...कोरोनाविरुद्ध लढतायेत हे 'मराठी योद्धे', देशभर होतंय कौतुक
महाराष्ट्रातील एकुण अठरा विद्यार्थी येथे असून त्यांच्यासोबत पाच पालक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 4 विद्यार्थ्यांचाही त्यात समावेश आहे. २२ मार्चपासुन हे सर्वजण येथे आहेत.
यवतमाळ तालुक्यातील सानिया प्रशांत रहाटे (8वी), अर्थव दयाशंकर मडावी (2 री), गौतमी संजय बरडे (9वी), तानीया नितीन अवासरे (9वी) या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. तसेच गणपत भडके (नांदेड) पोर्णिमा बरडे (नागपूर) निलम भतिजा (पुणे शिक्षिका) तसेच रेखा अगनानी ह्या तीन महीला येथे अडकून पडल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना या सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओमार्फत निवेदन दिले असुन 'आम्हाला घरी जायचंय' अशी आर्त साद ते घालत आहेत.