यवतमाळ- खरीप हंगाम सुरू झाला, तरी राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून आहे. हा कापूस कधी विकला जाईल याच्या चिंतेत सध्या शेतकरी आहे. त्यामुळेच, राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख यांनी सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात यावर प्रशासनाची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. या बैठकीनंतर 30 जूनपर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस घेतला जाईल देशमुख यांनी स्पष्ट केले.
आता पावसाळ्याच्या दिवसात हजारो शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करायचा आहे. त्यासाठी जिनिंग व्यवसायिकांना सुविधा द्याव्या लागतील. जिथे शेड आहे त्याच ठिकाणी ही कापूस खरेदी सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे देशमुख म्हटले. तसेच, राज्यात 29 मे ते 5 जून दरम्यान जो पाऊस कोसळला त्यामुळे पणन महासंघाचे 250 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.