महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पर्यावरण दिन; सिमेंटच्या जंगलात वनमंत्र्यांचा ‘नागरी वनांचा’ निर्धार - Yavatmal update news

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात जिल्हाधिकारी कार्यालयातून वनमंत्री राठोड हेेे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधून सहभागी झाले होते.

Forest minister in video conference
व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये वनमंत्री

By

Published : Jun 5, 2020, 8:13 PM IST

Updated : Jun 5, 2020, 9:18 PM IST

यवतमाळ - नागरी भागात जर वनांची उभारणी झाली तर ते शहरासाठी फुफ्फुस म्हणून काम करू शकते. त्यामुळे नागरी व शहरी भागात वनांची उभारणी करण्याचा निर्धार करण्याची वेळ आल्याचे मत वनमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. त्यांनी आज केंद्रीय पर्यावरण तथा वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधून साधला.


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात जिल्हाधिकारी कार्यालयातून वनमंत्री राठोड हेेे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधून सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, मुख्य वनसंरक्षक आर. के. वानखडे, यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानदास पिंगळे, सामाजिक वनीकरणचे विभागीय वनअधिकारी गौपाल उपस्थित होते.

वनमंत्री संजय राठोड म्हणाले, यवतमाळ शहरात वन विभागाने उभारलेल्या ‘ऑक्सीजन पार्क’च्या धर्तीवर जिल्ह्यात इतरही नागरी भागात वनांची निर्मिती काळाची गरज आहे. लोकसहभागातून हे काम शक्य आहे. मानवाच्या शरीरात फुफ्फुसाचे जे कार्य आहे, तेच कार्य शहरात नागरी वनांचे राहू शकते. त्यामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी.

जिल्हा हा वनांनी नटलेला जिल्हा आहे. वनविभागामार्फत येथे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात स्मृतीवन, सर्वधर्म वने, संस्कृती वृक्षांचे पूजन आदींचा समावेश आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या सर्व उपक्रमांत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वनमंत्र्यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभागाने तयार केलेल्या होर्डींग्जचे जिल्हाधिकारी कार्यालयात वनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ऑक्सीजन पार्क येथे वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी शहरातील ऑक्सीजन पार्क येथे वृक्ष लागवड केली. तसेच या संपूर्ण परीसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. अशा प्रकारचे उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्यादृष्टीने अतिशय आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Last Updated : Jun 5, 2020, 9:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details