यवतमाळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज जिल्ह्यातील राळेगाव येथे महाजनादेश यात्रा येत आहे. मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या पूर्वी प्रहार पक्षाचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख बिपीन चौधरी आणि यवतमाळ जिल्हा दारूबंदी अभियानाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आज सकाळी 6 वाजता स्थानबद्ध केले आहे.
यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा; प्रहारचे बिपीन चौधरी यांना केले स्थानबद्ध - राळेगाव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज जिल्ह्यातील राळेगाव येथे महाजनादेश यात्रा येत आहे. मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या पूर्वी प्रहार पक्षाचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख बिपीन चौधरी आणि यवतमाळ जिल्हा दारूबंदी अभियानाच्या कार्यकर्त्याना पोलिसांनी आज सकाळी 6 वाजता स्थानबद्ध केले आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे यवतमाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख बिपीन चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा यवतमाळ जिल्ह्यात येत असल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करून मोठे आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. तसेच यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी झाली पाहिजे यासाठी दारूबंदी महिलांच्या कार्यकर्त्याही आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून आज सकाळी सहा वाजता पासून त्यांना स्थानबद्ध करण्याची मोहीम राबविण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची आज यवतमाळ तर उद्या दारव्हा येथे यात्रा आहे. जिल्ह्याची सीमा यात्रेने पार केल्यानंतर स्थानबद्ध केलेल्यांची सुटका करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बिपीन चौधरी व इतर कार्यकर्त्यांना तर शहर पोलीस स्टेशन मधीलहद्दीत असलेल्या कार्यकर्त्यांना त्या पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहेत. स्थानबद्ध करण्यात आलेल्यांमध्ये जवळपास प्रहार पक्ष्याचे व दारूबंदी महिला आशा पंधरा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.