यवतमाळ - राजकारणात काम करताना हिंम्मत दाखवावी लागते. चूक झाली असेल तर ती मान्य करावी आणि राजीनामा द्यावा असा सल्ला भाजपचे माजी राज्यमंत्री आणि यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनी वनमंत्री संजय राठोड यांना दिला.
राजकारण उजीवीकेचे साधन नाही

पद आज आहे, उद्या नाही. राजकारण हे काही आपल्या उपजीविकेचे साधन नाही. आमदारकी ही काय आपली दुकानदारी आहे का? असा सवालही येरावार यांनी केला. तसेच आपल्या कुटुंबाला समाजात वावरताना ताठ मानेने जगता आले पाहिजे. त्यामुळे जर आपली चूक झाली असेल तर ती मान्य करावी आणि राजीनामा द्यावा असा सल्ला येरावारयांनी संजय राठोड यांना दिला.
मंत्री म्हणून समर्थनार्थ मोर्चा योग्य का?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे. या प्रकरणात संजय राठोड हे मंत्री असल्याने त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येत आहे. मात्र, पूजा चव्हाण हीसुद्धा याच समाजातील मुलगी आहेत. तिच्या समर्थनार्थ का कुणी पुढे येत नाही?. या प्रकरणी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत त्यावरून वनमंत्री संजय राठोड, अरुण राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यात संबंध असल्याचे स्पष्ट होत असल्याचे येरावार म्हणाले.