यवतमाळ -जिल्ह्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. पेरणी आणि लागवडीचे दिवस जवळ आल्याने शेतकऱ्यांना बियाणे घेण्यासाठी पैशाची तजवीज करीत आहेत. शेतकऱ्याच्या कर्जासाठी पुसद येथे यवतमाळ मध्यवर्ती बँकेसमोर ग्राहकांनी एकाच गर्दी केली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.
कर्ज घेण्यासाठी बँकेसमोर शेतकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागल्याचे दिसून आले. अनेकांनी चेहऱ्यावर मास्कही लावले नव्हते. कोरोनाच्या काळात संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा-पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय मागे घ्या; रिपाईची मागणी
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
जिल्ह्यात आजपासून लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहे. पुसद येथे शेतकरी ग्राहकांनी बँकेसमोर एकच गर्दी केली होती. सध्या शेतकऱ्यांची शेतीचे कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी बॅंकेसमोर प्रचंड गर्दी केली आहे. याशिवाय शेतकरी सन्मान निधीचे पैसे बँकेत जमा झाले आहेत. तसेच पीक विमा कंपनीकडून बँकेत पैसे जमा करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पुसद येथे या यवतमाळ मध्यवर्ती बँकेसमोर प्रचंड गर्दी केली होती.