यवतमाळ- यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे प्रश्न कोण संसदेत मांडणार? हे थोड्याचवेळात स्पष्ट होणार आहे. यासाठी शहरातील दारवा मार्गावरील सरकारी ग्रेड गोडाऊनमध्ये थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे. यावेळी शिवसेनेकडून विद्यमान खासदार भावना गवळी रिंगणात होत्या, तर त्यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी निवडणूक लढवली. शिवाय या दोघांही राजकीय धुरंदरांपुढे प्रहार संघटनेच्या वैशाली येडे यांनी तगडे आव्हान निर्माण केले होते. आता या तिहेरी लढतीत यवतमाळ-वाशिमचे मतदार विजयाचा कौल कोणाला देणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
LIVE UPDATES -
- सा.७.30 -भावना गवळी यांचा विजय झाला आहे, त्यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.
- सा. ६.00- भावना गवळी ७८ हजार २२२ मतांनी आघाडीवर
- दु. ३.१७ - भावना गवळी ४६ हजार ३४९ मतांनी आघाडीवर
- दु. २.५१ वा. - भावना गवळी ४४ हजार ६५४ मतांनी आघाडीवर
- दु. १.३७ वा. - सहाव्या फेरीच्या अखेरीस भावना गवळी १३ हजार २६२ मतांनी आघाडीवर
- दु. १.२६ वा. - भावना गवळी २७ हजार मतांनी आघाडीवर
- दु. १२.५१ वा. - मतदार वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून खासदारकी देणार आहेत - भावना गवळी
- दु. - १२.०७ वा. - भावना गवळी १० हजार मतांनी आघाडीवर
- स. ११.५६ वा. - भावना गवळी ३८०० मतांनी आघाडीवर
- स. १०.५५ - भावना गवळी ७२ हजार ७७१ मतांनी आघाडीवर
- स. १०. ०० वा - युतीच्या भावना गवळी यांना १७ हजार ७७८, तर काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांना १४ हजार ७४७ मतं पडलेली आहे.
- स. ९.४० वा - युतीच्या भावना गवळी ४ हजार मतांनी आघाडीवर
- स. ९.१२ वा. - महायुतीच्या उमेदवार खासदार भावना गवळी आघाडीवर
स. ९.१० वा. - माणिकाराव ठाकरे मतदान केंद्रावर हजर. या निवडणुकीत मीच निवडून येणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला. - स. ८ वा - मतमोजणीला सुरुवात
- स. ७.४५ वा. - काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन देवाकडे विजयासाठी साकडे घातले. तसेच विजय होणार असल्याचे सांगितले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान -