महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

LIVE निकाल यवतमाळ: यवतमाळ मतदारसंघात भाजपचे मदन येरावार विजयी - pusad, digras, umarkhed election 2019 result

यवतमाळ जिल्ह्यात एकूण ७ मतदारसंघ आहेत. यंदाच्या निवडणुकीत ६६.२०% मतदान झाले आहे. यंदा भाजपला आपल्या जागा टिकवता येतील की जिल्ह्यात पुन्हा आघाडीचे राज्य येईल, हे आजच्या निकालात स्पष्ट होणार आहे.

यवतमाळमध्ये कोण मारणार बाजी, पहा लाईव्ह अप्डेट

By

Published : Oct 24, 2019, 8:21 AM IST

Updated : Oct 24, 2019, 9:45 PM IST

यवतमाळ- जिल्ह्यात एकूण ७ मतदारसंघ आहेत. यंदाच्या निवडणुकीत ६६.२०% मतदान झाले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ७ जागांपैकी भाजपला ५ जागा जिंकण्यात यश आले होते. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी १ जागा मिळवता आली. २०१४ च्या निवडणुकीपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील ७ ही मतदारसंघात काँग्रेसचा बोलबाला होता. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेस भुईसपाट झाली होती. सध्या जिल्ह्यातील तीन मंतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहे. दिग्रसचे शिवसेनेचे आमदार संजय राठोड आघाडीवर तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यातील एकमेव गड पुसद येथे राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक आघाडीवर आहे.

LIVE UPDATE:

  • २०.३७- यवतमाळ मतदारसंघात भाजपचे मदन येरावार विजयी.
  • २०.०६- वणी मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार हे २७१२५ मतांनी विजयी झाले आहे.
  • १९.१२- वणी मतदारसंघात भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार हे ५५७०२ मतांनी आघाडीवर आहे. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे वामनराव कासावार हे ३१७७६ मतांनी तर मनसेचे राजू उंबरकर हे १४०३८ मतांनी मागे आहे.
  • १८.५०- यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब मांगुलकर हे ३०६५ मतांनी आघाडीवर आहे.
  • १८.४०- वणी मतदारसंघात भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार हे ५२०९७ मतांनी आघाडीवर आहे. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे वामनराव कासावार हे ३०४०३ मतांनी तर मनसेचे राजू उंबरकर हे १३४५० मतांनी मागे आहे.
  • १८.०८- आर्णी मतदारसंघात भाजपचे उमेदवार संदीप धुर्वे ३२७४ मतांनी विजयी.
  • १८.२०- वणी मतदारसंघात भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार हे ४७७०२ मतांनी आघाडीवर आहे. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे वामनराव कासावार हे २६९३१ मतांनी तर मनसेचे राजू उंबरकर हे १२७६४ मतांनी मागे आहे.
  • १८.०८- आर्णी मतदारसंघात भाजपचे उमेदवार संदीप धुर्वे ३२७४ मतांनी विजयी.
  • १७.४९- यवतमाळ मतदारसंघात १८ व्या फेरीत काँग्रेसचे बाळासाहेब मांगुलकर ७९२७ मतांनी आघाडीवर आहे.
  • १८.०८- आर्णी मतदारसंघात १९व्या फेरीत भाजपचे उमेदवार संदीप धुर्वे हे विजयाच्या मार्गावर आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे.
  • १७.५५- यवतमाळ मतदारसंघ १९ व्या फेरीत काँग्रेसचे बाळासाहेब मांगुलकर ६८७४ मतांनी आघाडीवर आहे.
  • १५.५२- वणी मतदारसंघात भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार हे ४४७१२ मतांनी आघाडीवर आहे. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे वामनराव कासावार हे २५४८१ मतांनी तर मनसेचे राजू उंबरकर हे ११५२८ मतांनी मागे आहे.
  • १७.४९- यवतमाळ मतदारसंघात १८ व्या फेरीत काँग्रेसचे बाळासाहेब मांगुलकर ७९२७ मतांनी आघाडीवर आहे.
  • १७.१३- यवतमाळ मतदारसंघात २१ व्या फेरीत काँग्रेसचे बाळासाहेब मांगुलकर हे ५४२६ मतांनी आघाडीवर आहे.
  • १७.१२ - आर्णी मतदारसंघात भाजपचे संदीप धुर्वे हे शेवटच्या फेरी अखेर १६५२ मतांनी आघाडीवर आहे. मात्र धुर्वे आणि काँग्रेस मतदार यांच्यामध्ये कमी मतांचा फरक असल्याने काँग्रेसने फेर मतदानाची मागणी केली आहे.
  • १७.०८- उमरखेड मतदारसंघातून भाजपचे नामदेव ससाने ९४२७ मतांनी विजयी. नामदेव ससाणे यांना ८७०४८ मत मिळाली आहे. तर त्यांच्या पाठोपाठ विजय खडसे यांना ७७६२१ मते मिळाली आहे.
  • १६.२२- १९ व्या फेरीत यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब मंगुलकर हे १०७३१ मतांनी आघाडीवर.
  • १६.२२- यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब मंगुलकर ५५८६० मतांनी आघाडीवर असून त्याच्या पाठोपाठ भाजपचे मदन येरावर हे ४५१२९ मतांनी त्याच्या मागे आहे.
    ग्रेसचे १६.१७- उमरखेड मतदारसंघात भाजपचे नामदेव ससाणे हे विजयाच्या मार्गावर आहे.
  • १६.११- आर्णी मतदारसंघात भाजपचे डॉ. संदीप धुर्वे हे २४६४ मतांनी आघाडीवर आहे.
  • १६.०६- वणी मतदारसंघात मतमोजणी थाबली आहे.
  • १५.५२- पुसद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील नाईक यांचा ९७०१ मतांनी विजय. इंद्रनील नायक यांनी त्यांचे चुलत भाऊ व भाजपचे उमेदवार निलय नाईक यांचा पराभव केला आहे.
  • १५.४३ वणी मतदारसंघात भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार १५६९० मतांनी पुढे आहे.
  • १५.४३ वणी मतदारसंघात भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार ३४१४१ मतांनी आघाडीवर आहे. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे वामनराव कासावर हे १८४५२ मतांनी तर मनसेचे राजू उंबरकर हे ९००३ मतांनी मागे आहे.
  • १५.४० दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय राठोड हे ६३६०७ मतांच्या फरकाने विजयी. ते सलग चौथ्यांदा यवतमाळ मतदारसंघात निवडूण आले आहेत.
  • १५.११- उमरखेड मतदारसंघात भाजपचे नामदेव ससाने हे २०८ मतांनी आघाडीवर.
  • १५.११- उमरखेड मतदारसंघात १६ व्या फेरीत भाजपचे नामदेव ससाणे हे ५२४०० मतांनी आघाडीवर आहे. त्यांच्या पाठोपाठ थोड्याच मतांनी काँग्रेसचे विजय खडसे हे ५२१९२ मतांनी तर अपक्ष उमेदवार डॉ. विश्वनाथ विनकरे हे १४२५६ मतांनी मागे आहे.
  • १५.००- राळेगाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके १०१४१ मतांनी विजयी.
  • १४.३८- आर्णी मतदारसंघात भाजपचे संदीप धुर्वे ८००३ मतांनी आघाडीवर आहे.
  • १४.११- राळेगाव मतदारसंघात भाजपचे अशोक उईके हे ९७१३ मतांनी आघाडीवर आहे. राळेगाव मतदारसंघात मतमोजणीची शेवटची फेरी सुरू असून येथे अशोक उईके हे विजयाच्या मार्गावर आहे.
  • १४.३८- आर्णी मतदारसंघात भाजपचे संदीप धुर्वे ८००३ मतांनी पुढे.
  • १३.४८- राळेगाव मतदारसंघात भाजपचे अशोक उईके शेवटल्या फेरीत ९७१३ मतांनी आघाडीवर असून ते विजयाच्या मार्गावर आहे.
  • १३.४८- वाशिम जिल्ह्याचे सद्याचे चित्र पाहता भाजप ३, सेना १, काँग्रेस २ व राष्ट्रवादी १ जागेवर आघाडीवर आहे.
  • १३.४८- उमरखेड मतदारसंघात भाजपचे नामदेव ससाणे ६३२७ मतांनी आघाडीवर आहे.
  • १३.४८- पुसद मतदारसंघात राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक हे २२ व्या फेरीत ११३९६ मताने आघाडीवर आहे.
  • १३.४८- आर्णी मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजी मोघे हे २४१२ मतांनी आघाडीवर आहे.
  • १३.४८- वणी मतदारसंघात भाजपचे संजीव बोदकूरवार आघाडीवर.
  • १३.४८- रोळेगाव मतदारसंघात भाजपचे अशोक उईके ९१३८ मतांनी आघाडीवर आहे.
  • १३.४८- दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे संजय राठोड हे ५२,१८० मतांनी आघाडीवर आहे.
  • १३.४८- यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब मंगुलकर ३२१३ मतांनी आघाडीवर आहे.
  • १३.०४- दिग्रस मतदारसंघात १५ व्या फेरीत शिवसेनेचे संजय राठोड ४२२९४ मतांनी आघाडीवर आहे.
  • १३.०३- यवतमाळ मतदारसंघात १५ व्या फेरीत काँग्रेसचे बाळासाहेब माणगुलकर २५२४ मतांनी आघाडीवर आहे.
  • १२.५८- वणी मतदारसंघात ६ व्या फेरीत भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार हे १३२०८ मतांनी आघाडीवर आहे. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे वामनराव कासावार हे ९१११ मतांनी तर मनसेचे राजू उंबरकर हे ६०१८ मतांनी मागे आहे.
  • १२.३२- उमेरखेड मतदारसंघात भाजपचे नामदेव ससाणे ४५८८ मतांनी आघाडीवर आहे.
  • १२.३२- पुसद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक १९००० मतांनी आघाडीवर आहे.
  • १२.३२- आर्णी मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजी मोघे २४४६ मतांनी आघाडीवर आहे.
  • १२.३२- वणी मतदारसंघात भाजपचे संजीवरेड्डी बोटकूरवार ४१२८ मतांनी आघाडीवर.
  • १२.३२- राळेगाव मतदारसंघात भाजपचे अशोक उईके हे ५९०५२ मतांनी आघाडीवर आहे.
  • १२.३२- दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे संजय राठोड ३१६६१ मतांनी आघाडीवर आहे.
  • १२.३२- यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब मांगुलकर ३०४२ मतांनी आघाडीवर आहे.
  • ११.३४- उमरखेड मतदारसंघात भाजपचे नामदेव ससाणे ४३२४ मतांनी आघाडीवर आहे.
  • ११.३४- पुसद मतदारसंघात राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक ८५१० मतांनी आघाडीवर आहे.
  • ११.३४- आर्णी मतदारसंघात काँग्रेसचा शिवाजी मोघे २०८९ मतांनी आघाडीवर आहे.
  • ११.३४- वणी मतदारसंघात भाजपचे संजीवरेड्डी बोटकूरवार २५१५ मतांनी आघाडीवर आहे.
  • ११.३४- राळेगाव मतदारसंघात भाजपचे अशोक उईके ५१६२ मतांनी आघाडीवर आहे.
  • ११.३४- दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे संजय राठोड १७००० मतांनी आघाडीवर आहे.
  • ११.३४- यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब मांगळुलकर २३७१ मतांनी आघाडीवर.
  • ११.०४- राळेगाव मतदारसंघात ९ व्या फेरीत भाजपचे डॉ. अशोक उईके ५१६२ मतांनी आघाडीवर.
  • १०.५१- यवताळ जिल्ह्यातील उमरखेड, राळेगाव, वणी येथे भाजप आघाडीवर आहे. दिग्रस मतदारसंघात शिवसेना आघाडीवर आहे. आर्णी आणि यवतमाळ या मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे. तर, पुसद मतदारसंघात राष्ट्रवादी आघाडीवर आहे.
  • १०.१३- यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब मांगळुकर २०९८ मतांनी आघाडीवर आहे.
  • १०.११- उमरखेड मतदारसंघात भाजपचे नामदेव ससाणे २०२० मतांनी आघाडीवर.
  • १०.११- पुसद मतदारसंघात राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक ३३०९ मतांनी आघाडीवर.
  • १०.११- आर्णी मतादारसंघात काँग्रेसचे शिवाजी मोघे २०३४ आघाडीवर.
  • १०.११- वणी मतदारसंघात काँग्रेसचे वामन कासावार २००० मतांनी आघाडीवर.
  • १०.११- राळेगाव मतदारसंघात भाजपचे अशोक उईके १५००
  • १०.११- दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे संजय राठोड ११०२१ मतांनी आघाडीवर.
  • १०.११- यवतमाळ मतदारसंघात भाजपचे मदन येरावर ३९ मतांनी आघडीवर.
  • १०.५८- दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे संजय राठोड ११०२१ मतांनी आघाडीवर.
  • १०.०५- उमरखेड मतदारसंघात भाजपचे नामदेव ससाने १२६२ मतांनी आघाडीवर.
  • ९.५८- दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे संजय रोठोड ४५०५ मतांनी आघाडीवर.
  • ९.५८- पुसद मतदारसंघात राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक २५५० मतांनी आघाडीवर.
  • ९.५८- आर्णी मतदारसंघात दुसऱ्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे २०३५ मतांनी आघाडीवर.
  • ९.५०- यवतमाळ मतदारसंघात भाजपचे मदन येरावार ३९ मतांनी आघाडीवर.
  • ९.५०- यवतमाळ मतदारसंघात भाजपचे मदन येरावार ५५८८ मतांनी आघाडीवर. त्या पाठोपाठ काँग्रेसचे बाळासाहेब माणगुळकर ५५४९ मतांनी मागे आहेत.
  • ९.२७- उमरखेड मतदारसंघात भाजपचे नामदेव ससाणे ३४ मतांनी आघाडीवर.
  • ९.१६- यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसचे विजय खडसे ४३ मतांनी आघाडीवर.
  • ९.११- आर्णी मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजी राव मोघे आघाडीवर.
  • ९.११- वणी मतदारसंघात भाजपचे संजीवरेड्डी बोटकूरवार आघाडीवर.
  • ९.११- दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे संजय राठोड आघाडीवर.
  • ९.०५- पुसद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक २५०० मतांनी आघाडीवर.
  • ८.४७- यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब मांगळुरकर आघाडीवर.
  • ८.४३- यवतमाळ मतदारसंघात पहिल्या फेरीत काँग्रेसचे बाळासाहेब मांगळुरकर २५० ते ३०० मतांनी पुढे.
  • ८.२७- पोस्टल मध्ये यवतमाळ मतदारसंघातून भाजपचे मदन येरावार आघाडीवर
  • ८.१० - पोस्टल मतमोजणीला सुरुवात
Last Updated : Oct 24, 2019, 9:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details