यवतमाळ- जिल्ह्यातील यवतमाळ आणि नेर नगरपरिषद हद्द वगळता ग्रामीण भागात दारू दुकाने सुरू करण्यास शशर्त परवानगी मिळाली आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत दुकाने खुली आहेत. त्यामुळे दारू खरेदीसाठी तळीरामांनी गर्दी केली. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले तरच दारू ग्राहकाला दिली जात आहे.
ग्रामीण भागात नियम पाळून दारू विक्री सुरू हेही वाचा-केईम रुग्णालयातील 'त्या' व्हायरल व्हिडिओचा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मागवला
ग्रामीण भागातील दारूची दुकाने उघडणार म्हणून तळीराम खुश झाले आहेत. दोन महिन्यांपासून दुकान बंद असल्याने तळीरामांचा घसा कोरडा होता. आता दारूचे दुकाने सुरू झाल्याने मद्यपींच्या जिवात-जीव आला आहे. यवतमाळ व नेर शहरात मात्र बंदी कायम असल्याने तेथील तळीरामांना अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.
वणी, पुसद, राळेगाव तालुक्यासह इतर ठिकाणची दुकाने उघडली आहेत. दारू खरेदीसाठी वाइन शॉपसमोर तळीरामांनी गर्दी केली. मात्र, सोशल डिस्टन्सिंगची कडक अंमलबजावणी करुन तपासणी केल्यानंतरच दारू विक्री केली जात आहे.