यवतमाळ -घाटंजी तालुक्यात अवैध दारूच्या भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 24 हजार 658 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी, 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
घाटंजी तालुक्यात हातभट्टीची दारू जप्त; 8 आरोपी ताब्यात - घाटंजी तालुका
पाढंरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात घाटंजी, पाढंरकवडा व पारवा पोलीस ठाण्याने संयुक्तपणे ही कारवाई केली. घाटंजी तालुक्यातील चोरंबा आणि शिरोली येथे मोठ्या प्रमाणावर अवैध देशी व गावठी दारू असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या होत्या. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारून अवैध गावठी दारूसाठा जप्त केला.
आरोपी
पाढंरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात घाटंजी, पाढंरकवडा व पारवा पोलीस ठाण्याने संयुक्तपणे ही कारवाई केली. घाटंजी तालुक्यातील चोरंबा आणि शिरोली येथे मोठया प्रमाणावर अवैध देशी व गावठी दारू असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या होत्या. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारून अवैध गावठी दारूसाठा जप्त केला.