यवतमाळ - जिल्यातील आर्णी तालुक्यातील पहुर नस्करी येथे शिवारात शेतकऱयांना बिबट्याचा बछडा आढळला आहे. शेतकऱयांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क करून बिबट्याच्या बछडा वनविभागाकडे सुपूर्त केले आहे.
आर्णी तालुक्यातील पहूर नस्करीत आढळला बिबट्याचा बछडा - Forest
यवतमाळ जिल्यातील आर्णी तालुक्यातील पहुर नस्करी येथे शिवारात शेतकऱयांना बिबट्याचा बछडा आढळला आहे.
आर्णी तालुक्यातील पहुर नस्करी वन परिक्षेत्रातील एका शेतात बिबट्याचा बछडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मादी बिबटचा शोध लावण्यासाठी वनविभागाने या भागात ट्रॅप, कॅमेरे लावले आहेत. सध्या या भागात पाणी नसल्याने जंगली प्राणी गावाकडे पाण्याच्या शोधत भटकत आहेत. मादी बिबट आणि बछडा त्याच कारणाने या भागात आले असल्याचे वन विभागाने म्हटले आहे. सध्या हा बछडा वनविभागाने देखरेखीखाली आहे.
आपल्या बछड्याच्या शोधत मादी बिबट केव्हाही येऊ शकते. त्यामुळे वनविभागाने दखल घेणे गरजेचे असल्याचे मत पहुर नस्करी येथील ग्रामस्थांचे आहे. वनविभागाने बिबट्याला पकडून मादी बिबट पासून नागरिकांना संरक्षण द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मादी बिबट कधी येतो यावर ग्रामस्थ व वनविभागाची यत्रंणा लक्ष ठेवून आहे