यवतमाळ - विधान परिषद निवडणुकीत बंडखोर उमेदवारांनी महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे. चार अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने आता दोन पक्षीय उमेदवारांसह एकूण सहा उमेदवार रिंगणात असणार आहेत.
यवतमाळमध्ये स्थानिक उमेदवारांनी विधानपरिषदेसाठी आपली उमेदवारी कायम ठेवली. स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून चारही बंडखोर एकत्र आल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणूक आखाड्यात आता सहा उमेदवार असणार आहेत. यवतमाळ विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवार) सात नामांकन मागे घेण्यात आले. मात्र, शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांची उमेदवारी कायम आहे. मुनगीनवार यांच्या बंडखोरीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराची अडचण वाढणार आहे.
यवतमाळ विधानपरिषद निवडणूकीत स्थानिक बंडखोरांची आघाडी... हेही वाचा... 'निवासी भागात हॉटेल, पब 24 तास सुरू ठेवण्यास विरोध'
विधानपरिषदेच्या रिंगणात आता महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी, भाजपचे सुमित बाजोरिया, अपक्ष बाळासाहेब मुनगीनवार, अपक्ष संजय देरकर, अपक्ष शंकर बडे, अपक्ष दिपक निलावर निवडणूक रिंगणात कायम आहे. या बंडखोर उमेदवारांनी स्वतःची नविन स्थानिक आघाडी तयार केली आहे. चार उमेदवारांपैकी एका उमेदवारासाठी मतदारांनी मतदान करावे, यासाठी हे उमेदवार जिल्ह्यात फिरून मत मागणार आहेत.
26 जानेवारीला त्यांच्या आघाडीचा उमेदवार ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून विधान परिषदेवर स्थानिक उमेदवार देण्याऐवजी बाहेरचा उमेदवार लादला जातो, असा या उमेदवारांचा आरोप आहे. त्याविरुद्ध या चारही उमेदवारांनी एकत्र येवून रणशिंग फुंकले आहे. तेव्हा ही निवडणुक चांगलीच रंगणार, असे दिसतंय.
हेही वाचा... 'हे सरकार सूड उगवणारे नाही'; मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला टोला