यवतमाळ - वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेले दहा एकरातील भाजीपाल्याचे पीक पाण्याअभावी संकटात सापडले आहे. यामुळे शेतकऱ्याला चार ते पाच लाख रुपयांचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुर्लक्षामुळे भाजीपाला पीक संकटात

राळेगाव तालुक्यातील सावरखेड येथे शेतकरी सागर येळेकर याने आपल्या १० एकरावरील शेतात ३ एकरावर कांदा पेरला आणि उर्वरित ७ एकरावर बाकी लसूण, मिरची आदी भाजीपाला लागवड केली. ऐन भाजीपाला काढणीवर येत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे सागर यांच्या शेतातील वीज गेल्या 20 दिवसांपासून बंद आहे. एकीकडे विधानसभेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यातर्फे वीज कनेक्शन तोडण्याबाबतची जी स्थगिती देण्यात आली होती, ती उठवण्याचा घोषणा केली आहे.
तक्रारींकडे दुर्लक्ष
दुसरीकडे वीज वितरणाच्या गलथान कारभाराचे उदाहरण राळेगाव तालुक्यात सावरखेड येथे उघडकीस आली आहे. वारंवार तक्रार करूनही वीज वितरण कंपनीने त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहे. पाण्याअभावी त्यांची हातातोंडाशी आलेले पीक आता वाळायला सुरुवात झाली आहे. यामुळे सागर यांचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान होत आहे.