यवतमाळ- वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (अशासकीय) किशोर तिवारी यांचा आज घांटजी येथे शासकीय दौरा आयोजित केला होता. यामध्ये घांटजी स्टेट बॅंक ऑफ इंडिया येथे शेतकरी कर्ज मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला घांटजी तहसीलदार उशिरा का आल्या या कारणावरुन यांनी घांटजी येथील महिला तहसीलदार पुजा माटोडे यांचे बाबतीत अपशब्द बोलून अपमानित केले. त्यामुळे महसूल संघटना उद्या पासुन काम बंद आदोंलनाचा पवित्रा घेणार आहेत.
शेतकरी स्वावलंबन मिशनच्या किशोर तिवारींची जिभ घसरली; तहसीलदारांबद्दल वापरले अपशब्द - किशोर तिवारींची जिभ घसरली
शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी तहसीलदारांबद्दल अपशब्द वापरल्याची घटना समोर आली आहे.
हेही वाचा-कर्जमाफी न मिळाल्याने यवतमाळमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
तहसीलदार पूजा मातोड यांनी आपले प्रतिनिधी या मेळावा करता पाठवली होते. मात्र शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महिला तहसीलदारांबद्दल अपशब्द वापरुन मेळाव्यात अपमानित केले. तसेच नायब तहसीलदार मिरगणे यांना "तू कार्यकारी दंडाधिकारी आहेस ना? तुम्हालाही प्रोटोकॉल समजत नाही का?" असे अपशब्द वापरले. त्यामुळे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी माफी मागावी, अन्यथा जिल्हाभरातील महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना तसेच महसूल कर्मचारी संघटनेकडून काम बंद आंदोलनाचा इशारा, तसेच किशोर तिवारी यांच्या सभेवर बहिष्कार करण्यासंदर्भात निवेदन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना देण्यात आले.