यवतमाळ -छत्रपती शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रात कर्जमाफीच्या घोषणा झाली. मात्र, त्यानंतरही ३० लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. याला फक्त मंत्रीच जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. तसेच सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
सहकार मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; किशोर तिवारींचा भाजपला घरचा आहेर - शेतकरी स्वावलंबन मिशन
शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळावी यासाठी शासनाच्या निकषाप्रमाणे ऑनलाईन अर्ज केले. मात्र, त्यापैकी बरेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये गोंधळ उडाला असून त्यासाठी सहकार मंत्री जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
![सहकार मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; किशोर तिवारींचा भाजपला घरचा आहेर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3646602-thumbnail-3x2-tiwari.jpg)
शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळावी यासाठी शासनाच्या निकषाप्रमाणे ऑनलाईन अर्ज केले. मात्र, त्यापैकी बरेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये गोंधळ उडाला असून त्यासाठी सहकार मंत्री जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
कर्जमाफीच्या प्रक्रियेत अनेक शेतकरी पुनर्गठणामुळेही अडचणीत आले आहेत. कर्जमाफीच्या प्रक्रियेत अनेक शेतकरी पुनर्गठणामुळेही अडचणीत आले आहेत. २०१५ पूर्वी या शेतकऱ्यांनी कर्ज उचलले. मात्र, पुनर्गठणाचे हप्ते यानंतर ५ वर्षांत फेडायचे आहे. असे कर्ज दीड लाखांच्या आत असल्यास ठरावीक वर्षापर्यंत ही कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे असे शेतकरी कर्जमाफीनंतरही थकबाकी राहण्याची शक्यता आहे.