यवतमाळ- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात एक खर्रा विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. त्याच्याकडे खर्रा खाण्यासाठी जाणारेही पॉझिटिव्ह निघाले. ही बाब उघडकीस आल्यानंतर अवधुतवाडी पोलिसांनी खर्रा विक्रेत्याला अटक केली असून त्याच्याकडून मशीन जप्त करण्यात आली आहे.
यवतमाळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 80 वर पोहोचली आहे. त्यांच्यावर आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू आहे. शहरातील एकाच भागातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहे. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन होण्यापूर्वी खर्रा विक्रीवर बंदी घातली होती. तरी देखील चोरट्या मार्गाने विक्री सुरूच राहिली. 20 रुपयाचा खर्रा 50 रुपयांच्या घरात पोहोचला. हाच खर्रा शटडाऊन केलेल्या भागात कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरला.
यवतमाळात खर्रा विक्रेत्याला कोरोनाची बाधा; खाणाऱ्यांनाही लागण - yawatmal corona news
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात एक खर्रा विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. त्याच्याकडे खर्रा खाण्यासाठी जाणारेही पॉझिटिव्ह निघाले. ही बाब उघडकीस आल्यानंतर अवधुतवाडी पोलिसांनी खर्रा विक्रेत्याला अटक केली असून त्याच्याकडून मशीन जप्त करण्यात आली आहे.
यवतमाळात खर्रा विक्रेत्याला कोरोनाची बाधा; खाणाऱ्यांनाही लागण
चोरट्या मार्गाने खर्रा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई केली गेली आहे. अवधूतवाडी पोलिसांनी अनिस शेख या विक्रेत्याला अटक केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.