यवतमाळ - विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने आज आर्णीरोडवर रास्तारोको व जेलभरो आंदोलन करून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली. यावेळी वेगळा विदर्भ राज्याची घोषणाबाजी करण्यात आली. अवधूतवाडी पोलीससांनी सात ते आठ जणांना यावेळी स्थानबद्ध केले आहे. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मागील अनेक वर्षापासून ही समिती लढा देत आहे. मात्र, शासनाने त्यांची कुठलीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आर्णीरोडवरील अभ्यंकर कन्या शाळेसमोर रस्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.
वेगळ्या विदर्भ राज्यासाठी जेलभरो आंदोलन, पोलिसांनी सात ते आठ जणांना घेतले ताब्यात - Demand for a separate Vidarbha state
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मागील अनेक वर्षापासून ही समिती लढा देत आहे. मात्र, शासनाने त्यांची कुठलीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आर्णीरोडवरील अभ्यंकर कन्या शाळेसमोर रस्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून स्वतंत्र विदर्भाचे राज्य करण्यात यावे, कोरोना काळातील वीज बिल माफ करून ते शासनाने भरावे, पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, अशा मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या आहेत.
वेगळ्या विदर्भ राज्यासाठी जेलभरो आंदोलन
यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून स्वतंत्र विदर्भाचे राज्य करण्यात यावे, कोरोना काळातील वीज बिल माफ करून ते शासनाने भरावे, पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, अशा मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या आहेत.
Last Updated : Aug 26, 2021, 4:49 PM IST