महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : गर्भपात केलेली मुलगी 'ती'च का? - puja chavan suicide case update

जिल्हा महाविद्यालयात रात्री दोन वाजता उपचारासाठी भरती झालेली ही तरुणी पूजा चव्हाण नसून पूजा अरुण राठोड असल्याची माहिती प्रसूती विभागाचे डॉ. श्रीकांत व्हराडे यांनी दिली. विभागप्रमुख म्हणून माझे नाव जरी समोर आले तरी मी त्यावेळी तिथे नव्हतो. त्यावेळी दुसरे विभागप्रमुख यांनी तिच्यावर उपचार केल्याची माहिती डॉ. श्रीकांत व्हराडे यांनी दिली. तिच्यावर इनकम्प्लिट स्पॉंटॅनिअस अबोर्शन विदाऊट कॉम्प्लिकेशन झाल्याचे सांगितले.

yawatmal government college.
यवतमाळ शासकीय महाविद्यालय.

By

Published : Feb 17, 2021, 8:00 PM IST

Updated : Feb 17, 2021, 8:57 PM IST

यवतमाळ - बीड येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखी मोठी माहिती समोर येते आहे. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरुण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची माहिती समोर आली आहे. 6 फेब्रुवारीला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ती उपचारासाठी भरती झाली होती. पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, नाव पूजा आणि त्यानंतर या प्रकरणात अरुण राठोड असलेले कनेक्शन यावरून पूजा चव्हाण हीच पूजा अरुण राठोड असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा.

विशेष म्हणजे मंत्री आणि अरुण राठोड यांची ही व्हायरल ऑडिओ क्लिप आहे. त्यातही प्रेग्नेंसी बाबत चर्चा होताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही नवी माहिती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

पूजा अरुण राठोड नावाची तरुणी रुग्णालयात दाखल झाल्याची प्रत.
रात्री दोन वाजता झाली भरती -

जिल्हा महाविद्यालयात रात्री दोन वाजता उपचारासाठी भरती झालेली ही तरुणी पूजा चव्हाण नसून पूजा अरुण राठोड असल्याची माहिती प्रसूती विभागाचे डॉ. श्रीकांत व्हराडे यांनी दिली. विभागप्रमुख म्हणून माझे नाव जरी समोर आले तरी मी त्यावेळी तिथे नव्हतो. त्यावेळी दुसरे विभागप्रमुख यांनी तिच्यावर उपचार केल्याची माहिती डॉ. श्रीकांत व्हराडे यांनी दिली. तिच्यावर इनकम्प्लिट स्पॉंटॅनिअस अबोर्शन विदाऊट कॉम्प्लिकेशन झाल्याचे सांगितले.

हेही वाचा -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, दोघांना घेतले ताब्यात?

इनकम्प्लिट स्पॉंटॅनिअस अबोर्शन विदाऊट कॉम्प्लिकेशन म्हणजे काय?

पूजा अरुण राठोड हिला 6 फेब्रुवारीला रात्रीच्या दोन वाजताच्या सुमारास उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यावेळेस तिच्यावर नकम्प्लिट स्पॉंटॅनिअस अबोर्शन विदाऊट कॉम्प्लिकेशन, असे उपचार करण्यात आले. यासंदर्भात ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा उपचार केला ते अद्यापही माध्यमांसमोर आले. खासगी रुग्णालयाचे डॉ. गिरीश माने यांना विचारणा केली असता हा स्वतःहून झालेला गर्भपात आहे. यात घरी उपचार घेतले असून अर्धवट झालेला गर्भपात असून यात कुठल्याही प्रकारची कॉम्प्लिकेशन झाले नसल्याचे सांगण्यात आले.

पोलीस तपासात होईल निष्पन्न -

पूजा अरुण राठोड या नावाने रुग्णालयात उपचारासाठी भरती झालेली तरुणी ही आत्महत्या प्रकरणातीलच आहे का? याचा तपास पुणे येथील वानवाडी पोलीस त्यांच्या पथकाने जिल्हा रुग्णालयात येऊन केला. त्यामुळे तपासात हीच पूजा चव्हाण आहे का? हे तपासाअंती समोर येणार आहे. मात्र, व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये अरुण राठोड आणि जिल्हा रुग्णालयात भरती असलेली पूजा अरुण राठोड या नावात साम्य आणि आत्महत्या प्रकरणातील तरुणीचा गर्भपात झाल्याचे व्हायरल क्लिपमधील संभाषण आणि याठिकाणी उपचारासाठी भरती असलेली तरुणीचाही झालेला गर्भपात, यामुळे हीच तरुणी असावी अशी शंका उत्पन्न केल्या जात आहे.

Last Updated : Feb 17, 2021, 8:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details