यवतमाळ - बेंबळा सिंचन घोटाळ्याप्रकरणी दोन कंत्राटदारसह तत्कालीन ५ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अवधुतवाडी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
यवतमाळातील सिंचन घोटाळा : दोन कंत्राटदारासह तत्कालीन पाच अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल - irrigation scam in yawatmal latest news
बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा सिंचन प्रकल्पात मुख्य कालव्याच्या 101 आणि 102 मातीकाम तसेच बांधकामाचा कंत्राट बनावट कागदपत्रांद्वारे मिळवण्यात आला होता. याप्रकरणी यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रार नोंदविण्यात आली होती.

जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा सिंचन प्रकल्पात मुख्य कालव्याच्या 101 आणि 102 मातीकाम तसेच बांधकामाचा कंत्राट बनावट कागदपत्रांद्वारे मिळवण्यात आला होता. याप्रकरणी यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रार नोंदविण्यात आली होती. यानंतर या सिंचन घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदार मुरलीधर रेड्डी, गंगाधर राव सह तत्कालीन अधिकारी वासुदेव जाधव, मदन माटे, ब.श. स्वामी, भी. अ. पुरी, महारु पाटील या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा -...तर कोरेगाव-भीमा प्रकरणाची राज्य सरकार समांतर चौकशी करेल - गृहमंत्री