महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रसूत झालेल्या महिलांना इन्फेक्शन; शासकीय रुग्णालयातील प्रकार - इन्फेक्शन

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात सिझरिंगने प्रसूत झालेल्या डझनावर महिलांना इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. महिलांना इन्फेक्शन झाल्याने रुग्णालयतील हलगर्जीपणा पुढे आला आहे.

वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय

By

Published : May 13, 2019, 7:26 PM IST

यवतमाळ - येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात सिझरिंगने प्रसूत झालेल्या डझनावर महिलांना इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परिणामी गेल्या महिनाभरापासून या महिलांना नवजात बाळांसह रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत.

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील प्रसुती विभागात २१ एप्रिल रोजी सिझरिंग झालेल्या महिलांनी शस्त्रक्रियेच्या ठिकाणी प्रचंड दुखत असल्याची तक्रार नातेवाईक यांनी केली. परंतु थोडी कळ सोसा, असे सांगत त्यांना अंधारात ठेवण्यात आले. एवढे दिवस कसले उपचार सुरू आहेत, याबद्दल महिलांच्या नातेवाईकांनी चौकशी केल्यावर प्रकरणाचा भांडाफोड झाला. याबाबत जास्त कुरबूर केल्यास थेट धमकावले जाते, असा आरोप प्रसूत महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे.

रुग्णालयातील प्रसुती विभागात इन्फेक्शन झालेल्या प्रसूत महिला आणि त्यांचे नातेवाईक प्रचंड दडपणात असल्याचे आढळून आले.

प्रसूती झालेल्या महिलांना टाक्यांमध्ये (टिचेस) इन्फेक्शन झाले असल्याची बाब पुढे आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना इन्फेक्शन झाल्याने रुग्णालयतील हलगर्जीपणा पुढे आला आहे. या विभागातील एकूण १४ महिलांना अशाच प्रकारचे इन्फेकेशन झाल्याची माहिती आहे.

पुसद तालुक्यातील ज्ञानेश्वर पैठणकर यांच्या पत्नीला बाळंतपणासाठी २० एप्रिलला रुग्णालयात दाखल केले. त्यांचे २१ एप्रिलला त्याचे सीझर करण्यात आले. मात्र, त्यानंतर ४ ते ५ दिवसांनंतर सुट्टी मागितली असता टाके ओले असल्याचे कारण सांगून थांबविण्यात आले. मात्र, रुग्णाला सीझर केलेल्या ठिकाणी टाक्यांमधून रक्तस्त्राव होत होता. शिवाय वेदना सुद्धा होत होत्या. याबाबत संबंधित विभाग प्रमुखाला सांगितले असता त्यानी उडवाउडवीचे उत्तर देऊन उपचार सुरू असल्याचे सांगतले ८ मे पर्यंत डॉक्टरांचा हे उत्तर देत राहिले. ९ मेला बधिर न करता पुन्हा नव्याने टाके मारण्यात आले आणि रुग्णाला तडफडत ठेवले असल्याचा आरोप सुद्धा नातेवाईकांनी केला आहे.

धामणगाव तालुक्यातील तळेगाव दसासर येथील श्रीकृष्ण बोन्द्रे यांच्या बहिणीला सुद्धा अशाच प्रकारे प्रसूतीसाठी आण्यात आले. तिला सीझर नंतर इन्फेक्शन झाल्याचे पुढे आले आहे. ती सुद्धा गेल्या महिन्याभरापासून रुग्णालयाच्या खाटेवर आहे. रुग्णालयातील प्रसुती विभागात इन्फेक्शन झालेल्या प्रसूत महिला आणि त्यांचे नातेवाईक प्रचंड दडपणात असल्याचे आढळून आले. त्यांना या घटनेची वाच्यता करण्यास दबाव आणण्यात आले असल्याचे पुढे आले आहे.

इन्फेक्शन कन्ट्रोल कमिटी मार्फत चौकशी करण्यात येणार

याबाबत रुणालयातील प्रभारी अधिष्ठाता डॉ. भारती यांनी इन्फेक्शन बाबत आम्हला मौखिक तक्रारी प्राप्त झाल्या. यावरून ५ सदस्यीय इन्फेक्शन कन्ट्रोल कमिटी मार्फत चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्याचे उत्तर दिले. रुग्णालयातील डॉक्टराचा सहभाग असलेल्या समिती कडून या प्रकरणी काय कारवाई होते कि दोषी डॉक्टरांना वाचवले जाते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. प्रसूत महिलांबाबत इन्फेक्शनचा प्रकार गंभीर आहे. आगामी बैठकीत याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. शासकीय रुग्णालयाचेअभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. अशोक उईके यानी सांगितले.

यवतमाळचे जिल्हा शासकीय रुग्णालय ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आशास्थान आहे. ग्रामीण भागातून रुग्णाची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे प्रसूतीसाठी रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संखेमुळे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णामध्ये विशेष काळजी घेण्यात येत नसल्याने इन्फेक्शनमध्ये वाढ झाली आहे. तसेच शस्त्रक्रिया करते वेळी योग्य ती काळजी घेण्यात येत नसल्याने हा प्रकार घडल्याचे अभ्यागत मंडळाचे माजी सदस्य सुरेंद्र राऊत यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details