महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 13, 2021, 8:35 PM IST

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये पहिल्यांदाच एका दिवसांत 953 कोरोनाबाधितांची नोंद, 23 जणांचा मृत्यू

यवतमाळमध्ये आज एकाच दिवशी पहिल्यांदाच 953 पॉझिटिव्ह रुग्ण आणि 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. कोरोनाचा वाढत चालला उद्रेक पाहता जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण संचारबंदीचे आदेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोना रुग्ण
कोरोना रुग्ण

यवतमाळ: जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून एका दिवसात सर्वाधिक 234 पॉझिटिव्ह रुग्ण तर 15 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र, आज पहिल्यांदाच एका दिवशी 953 पॉझिटिव्ह रुग्ण आणि 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. नागरिकांना वारंवार नियमाचे पालन करण्याचे व संचारबंदीचे आदेश देऊन सुद्धा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा वाढत चालला उद्रेक पाहता जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण संचारबंदीचे आदेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यवतमाळमध्ये पहिल्यांदाच एका दिवसांत 953 कोरोनाबाधितांची नोंद
आतापर्यंत 782 मृत्यूची नोंदजिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गेल्यावर्षी मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात एकही मृत्यू या आजाराने झाला नव्हता. मात्र त्यानंतर मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाली. मागील डिसेंबर महिन्यात डिसेंबर 30, जानेवारी 25, फेब्रुवारी 36 मृत्यू झाले होते. तर मार्च महिन्यात 194 दगावले. 3786 ऍक्टिव्ह रुग्ण -जिल्ह्यातील पुसद, यवतमाळ, पांढरकवडा, दिग्रस, दारव्हा, घाटंजी, वणी, महागाव, उमरखेड या तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली असून दररोज 800 वर रुग्ण निघत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तीन हजार 786 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याचा पॉझिटिव्हिटी दर हा 11.12 इतका आहे. खासगी व शासकीय रुग्णालय फुल्ल -जिल्ह्यात 17 खासगी कोव्हिड हॉस्पिटल असून जिल्हा रुग्णालय, सुपरस्पेशालिटी या सर्व ठिकाणी 2955 बेड आहेत. मात्र आज शासकीय व खाजगी कुठल्याच रुग्णालयात एकही बेड शिल्लक नसून रुग्णांना ओपीडी फीवरमध्ये चार ते पाच तास ऑक्सीजन लावून थांबावे लागत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार असाच झपाट्याने वाढत राहिला जिल्ह्याची परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी प्रसनाला कसरत करावी लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details