महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पांढरे सोने झाले रंगीत; मारेगाव तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी - colored cotton grown in yavatmal

यवतमाळ जिल्हा पांढर्‍या सोन्याचा जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. मात्र, जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पांढर्‍या सोन्याला रंगीत करण्याची किमया करून दाखवली आहे.

रंगीत कापूस
रंगीत कापूस

By

Published : Jan 4, 2021, 6:49 PM IST

यवतमाळ - यवतमाळ जिल्हा पांढर्‍या सोन्याचा जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. मात्र, जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पांढर्‍या सोन्याला रंगीत करण्याची किमया करून दाखवली आहे. आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या रंगीत कापूस बियाण्याची जपून करून मागील बारा वर्षापासून दरवर्षी काही झाडे ते लागवड करीत आहेत. या बियांची संख्या वाढत चालली आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याची नाव परवेज मूज्जफर पठाण असून ते वकिलीचा व्यवसाय करतात. एक प्रयोगशील शेतकरी म्हणून ते परिसरात परिचित आहे.

पांढरे सोने झाले रंगीत
अल्प खर्चात कपाशीची लागवड-यवतमाळ जिल्ह्यातील कापूस हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकला जातो. परंतु त्याचा शेतकऱ्यांना कवडीचाही लाभ मिळत नाही. वर्षभर शेतात घाम गाळून विकलेल्या कापसाला कवडीमोल भावात विकावे लागते. परंतु व्यवसायाने वकील असलेले पठाण या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात रंगीत कापूस पिकविला. हा कापूस कथीया व पिवळ्या रंगाचा आहे. या कापसाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर कापसापेक्षा खत, औषधी व फवारणी फार कमी लागते. तसेच त्याचा धागा लांब असल्याने या कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
रंगीत कापूस
पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात लागवड करणार-यावर्षी कमी प्रमाणात रंगीत कापसाची लागवड केली. यातून निघणाऱ्या बियानातून पुढील वर्षी दहा एकरावर व त्यापेक्षा जास्त ही कापूस लागवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी आपल्या प्रायोगिक तत्त्वावर या रंगीत कपाशीच्या प्रयोग केल्यास निश्चित जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नशिब बदलून कापसाला चांगला भाव मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
रंगीत कापूस
रंगीत कापूस
रंगीत कापूस

ABOUT THE AUTHOR

...view details