महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतप्त शेतकऱ्यांनी फोडल्या युनियन बँकेच्या काचा; महागाव येथील घटना - युनियन बँक यवतमाळ बातमी

सकाळीपासूनच महागाव येथील युनियन बँकेसमोर शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी व नवीन खाते उघडण्यासाठी गर्दी केली होती. पण बँकेच्या थंड कारभारामुळे शेतकऱ्यांना बँकेबाहेर तात्कळत उभे राहावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या बँकेच्या थंड कारभाराला कंटाळून शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

संतप्त शेतकऱ्यांनी फोडल्या युनियन बँकेच्या काचा
संतप्त शेतकऱ्यांनी फोडल्या युनियन बँकेच्या काचा

By

Published : Oct 30, 2020, 3:00 PM IST

यवतमाळ - पीक कर्जासाठी आणि नवीन खाते उघडण्यासाठी शेतकऱ्यांनी युनियन बँकेसमोर गर्दी केली. पण हेकेखोर सुरक्षारक्षकांनी समोरचे चॅनेल गेट उघडले नाही. शेवटी सुरक्षारक्षकाला बाजूला सारून शेतकऱ्यांनी बँकेचे गेट उघडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीत बँकेतील काचा फोडण्याचा प्रकार घडला.

संतप्त शेतकऱ्यांनी फोडल्या युनियन बँकेच्या काचा

ही घटना जिल्ह्यातील महागाव येथे घडली. सकाळीपासूनच महागाव येथील युनियन बँकेसमोर शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी व नवीन खाते उघडण्यासाठी गर्दी केली होती. पण बँकेच्या थंड कारभारामुळे शेतकऱ्यांना बँकेबाहेर तात्कळत उभे राहावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या बँकेच्या थंड कारभाराला कंटाळून शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

दोनच दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी कर्ज वितरणासाठी सुसूत्रता आणावी म्हणून बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. पण बँकेचे अधिकारी मात्र, अद्याप शेतकऱ्यांना कर्जवाटपाबाबत हेकेखोर भूमिका घेत आहेत. त्यामुळेच ही घटना घडलेली आहे.

हेही वाचा -यवतमाळमध्ये 71 जण कोरोनामुक्त; 55 नव्याने पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details