यवतमाळ - कोरोनाकाळात बाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी शासन व राजकीय निर्णय जेवढे महत्त्वाचे होते. तेवढाच वाटा खासगी रुग्णालयाचा आहे. सर्वाधिक उपचार हे खासगी रुग्णालयात होत असताना दुर्दैवाने गेल्या दीड वर्षांमध्ये आरोग्य यंत्रणेवर, आरोग्य कर्मचाऱ्यावर आणि खासगी रुग्णालयांमध्ये हल्ले झाले आहेत. त्यामुळे शासनाने यावर कठोर कायदा अमलात आणावा, यासाठी आज (शुक्रवारी) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने काळे फीती व काळे मास्क लावून निषेध दिन पाळण्यात आला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यवतमाळमध्ये डॉक्टरांवर होणाऱ्या हिंसाचाराविरुद्ध आयएमएने पाळला 'निषेध दिन' - यवतमाळ डॉक्टर आंदोलन
आरोग्य कर्मचाऱ्यावर आणि खासगी रुग्णालयांमध्ये हल्ले झाले आहेत. त्यामुळे शासनाने यावर कठोर कायदा अमलात आणावा, यासाठी आज (शुक्रवारी) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने काळे फीती व काळे मास्क लावून निषेध दिन पाळण्यात आला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठीचा केंद्रीय कायदा पारित करण्यात यावा, या कायद्याचा मसुदा संसदेमध्ये तयार आहेत. फक्त गृहमंत्रालयाच्या काही आक्षेपामुळे तो कायदा पारित होण्यापासून थांबलेले आहे. तो त्वरित पारित करण्यात यावा, सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात यावेत, रुग्णालयाच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करण्यात यावे, अशा हल्लेखोर व्यक्तीवरील खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, अशा मागण्या यावेळी आयएमएकडून करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया टीव्ही सिरीयलमधील दोन अभिनेत्रींना अटक