महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोवंश तस्करी करणारे वाहन जप्त, आरोपी फरार - यवतमाळ जिल्हा लेटेस्ट न्यूज

मारेगाव तालुक्यातील बाभई फाटा परिसरात अवैध पद्धतीने गोवंशाची वाहतूक करणारा टेम्पो आणि एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. मात्र पोलिसांचा छापा पडताच यातील गोवंश तस्कर फरार झाले आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोवंश तस्करी करणारे वाहन जप्त
गोवंश तस्करी करणारे वाहन जप्त

By

Published : Apr 4, 2021, 5:50 PM IST

यवतमाळ -मारेगाव तालुक्यातील बाभई फाटा परिसरात अवैध पद्धतीने गोवंशाची वाहतूक करणारा टेम्पो आणि एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. मात्र पोलिसांचा छापा पडताच यातील गोवंश तस्कर फरार झाले आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोवंश तस्करी करणारे वाहन जप्त

टेम्पोसह दुचाकी जप्त

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधिकारी जगदीश मंडलवार यांच्या पथकास अवैधपणे गोवंशाची वाहतूक आणि तस्करीची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून मारेगाव तालुक्यातील बाभई फाटा परिसरात गोवंशाची वाहतूक करणारा टेम्पो आणि एक दुचाकी जप्त केली आहे. यातील आरोपी मात्र फरार झाले आहेत. पोलिसांनी टेम्पो आणि दुचाकीसह टेम्पोमधील पशूधन जप्त केले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा -मुंबईत पुन्हा लॉकडाऊनची शक्यता; मुंबईकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया..

ABOUT THE AUTHOR

...view details