महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरला जाणारी दारू पकडली; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त - यवतमाळ-चंद्रपूर दारू वाहतूक

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, येणाऱ्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमधून चंद्रपूरमध्ये दारू वाहतूक होत आहे. पोलिसांनी दारू वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे.

tempo
टेम्पो

By

Published : Dec 25, 2020, 10:44 AM IST

Updated : Dec 25, 2020, 10:57 AM IST

यवतमाळ -31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातून दारूबंदी असलेल्या चंद्रपूरमध्ये छुप्या मार्गाने दारूची तस्करी सुरू आहे. यामुळे शहरात पोलिसांनी गस्त वाढवली आहे. काल (गुरुवार) रात्री विदेशी दारूची वाहतूक करणारा एक टेम्पो पोलिसांनी पकडला. याप्रकरणी वाहन चालकाला अटक केली असून 4 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिथुन लहानुजी घोटेकर (35, रा. पंचशिल वॉर्ड चंद्रपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न -

अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे जमादार सतीश चौधरी यांना दारू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. लॉर्ड वाईन शॉपीमधून एका मालवाहू गाडीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारू साठा जात असल्याची ही माहिती होती. या माहितीवरून त्यांनी शनीमंदिर चौक येथे सापळा रचला. पोलिसांना एक मालवाहू वाहन संबंधित ठिकाणावरून निघताना आढळले. पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग केला. पोलीस कर्मचारी मागावर असल्याची कुणकुण लागताच संबंधित वाहनचालकाने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तहसील कार्यालयाजवळ त्या वाहनाला पकडले.

भाजीपाला कॅरेटमधून दारूची तस्करी -

पकडलेल्या वाहन चालकाची चौकशी करून तपासणी केली असता भाजीपाला असलेल्या कॅरेटमध्ये दोन पेट्या विदेशी दारूसाठा आढळला. हा सर्व दारूसाठा चंद्रपूर जिल्ह्यात किरकोळ विक्री करण्यासाठी जात असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.

Last Updated : Dec 25, 2020, 10:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details