महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राज्याच्या कामकाजात केंद्राचा हस्तक्षेप होत असेल, तर आमचं सरकार गप्प बसणार नाही' - Rajya Sabha Leader of the Opposition Gulab Nabi Azad

महाराष्ट्रात झालेल्या प्रकरणात चौकशी करण्याकरिता NIA ला आणले जाते. महाराष्ट्राचे पोलीस कमकुवत आहे का ? असा सवाल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित केला.

कार्यकर्ता मेळावा यवतमाळ
अशोक चव्हाण

By

Published : Feb 16, 2020, 4:09 AM IST

यवतमाळ -'भाजपने देशामध्ये थैमान घातले आहे. कार्यकर्त्यांच्या छळ केला गेला. त्यामुळेच आम्ही सर्व भाजपला दूर ठेवण्यासाठी एकत्र आलो आहे. विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. कार्यकर्त्यांनी विनाकारण त्रास दिला जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात झालेल्या प्रकरणात चौकशी करण्याकरिता NIA ला आणले जाते. महाराष्ट्राचे पोलीस कमकुवत आहे का ? असा सवाल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.

यवतमाळ येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मंत्री अशोक चव्हाण आणि गुलाब नबी आजाद

तसेच राज्याच्या कामकाजात जर केंद्राचा हस्तक्षेप होत असेल, तर आमचे सरकार गप्प बसणार नाही, असा इशाराही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला.

हेही वाचा......तर कोरेगाव-भीमा प्रकरणाची राज्य सरकार समांतर चौकशी करेल - गृहमंत्री

देशाची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे. अशा स्थितीत केंद्र सरकार आपल्या कमतरता लापवण्याचे काम करत आहे. प्रत्येक क्षेत्रात पिछाडी होत आहे. मात्र, शेतकरी, बेरोजगारी यांसारखे महत्त्वाचे मुद्दे असतानाही ध्रुवीकरण करीत हिंदू-मुस्लीम बांधवात भिंती उभ्या केल्या जात आहे, असा आरोप काँग्रेसचे राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाब नबी आजाद यांनी केला.

यवतमाळ येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर, विजय वड्डेटीवार, गुलाब नबी आजाद यांचा सत्कार करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details