यवतमाळ- चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करून पतीने उंदीर मारण्याचे औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना घाटंजी येथे घडली.
घाटंजीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून: पतीचा आत्महत्येचा प्रयत्न - यवतमाळ हत्या
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करून पतीने उंदीर मारण्याचे औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना घाटंजी येथे घडली.
प्रीती रवींद्र भोयर, असे मृत महिलेचे नाव आहे. घाटंजी शहरातील घाटी परिसरात रवींद्र तानबाजी भोयर (35) याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केली. नतंर पती त्याने पत्नी प्रीतीच्या डोक्यावर दगडी खलाने हल्ला केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यामुळे घाबरलेल्या पतीने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
शेजारच्या लोकांनी पतीला उपचारासाठी यवतमाळ येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. पुढील कारवाई एसडीपीओ अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दिनेश शुक्ला करीत आहेत. घाटंजी पोलीस ठाण्यात आरोपी रवींद्र भोयर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.