यवतमाळ - शारीरिक सुखाच्या कारणातून पती-पत्नीत झालेला वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घाटंजी तालुक्यातील पांगडी येथे घडली. दिशा संतोष ठाकरे, असे मृत पत्नीचे नाव आहे, तर संतोष ठाकरे असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. संतोषला घाटंजी पोलिसांनी अटक केली आहे.
माहिती देताना पोलीस अधिकारी हेही वाचा -यवतमाळमध्ये लहान मुलांसह म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी वेगळ्या वॉर्डाचे नियोजन
संतोष ठाकरे हा नेहमीच दिशासोबत शरीरसुखाच्या मागणीवरून वाद घालायचा. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद व्हायचे. संतोषने अनेक दिवसांपासून राग मनात धरला होता. अशातच आज संतोषने पुन्हा पत्नी दिशाला शरीर सुखाची मागणी करत वाद घातला. या वादात संतोषचा राग अनावर झाल्याने त्याने जवळच असलेल्या कुर्हाडीने दिशाच्या डोक्यात व मानेवर सपासप वार करून तिला जागीच ठार केले. पोलिसांनी पंचनामा करून संतोष गुरुदेव ठाकरे याला गजाआड केले आहे. पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहेत.
हेही वाचा -यवतमाळमध्ये त्र्याऐंशी वर्षांपासून जळतेय देवीची अखंड ज्योत