यवतमाळ - तालुक्यातील पिंप्री बुटी येथे घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात वजनदार वस्तू मारून निर्घृण हत्या केली. चंदा संजय ढुमने (वय ४५, रा. पिंप्री) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
घरगुती वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या - wife
या प्रकरणी वडगाव जंगल पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हत्येची घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. आरोपी संजय धुमनें पत्नीला मद्यप्राशन करण्यासाठी पैशाची मागणी करत होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. संजय संतापला त्याने टीव्ही पाहत असलेली चंदा ढुमने हिच्या डोक्यात वजनदार वस्तूने वार केला. यामुळे चंदाचा जागेवरच मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आला. या प्रकरणी वडगाव जंगल पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.