यवतमाळ- जिल्ह्यातील वणी येथील टिळकनगर येथील रहिवाशी नानूराम पटेल यांचे साई मंदिरच्या बाजूस कैलास पावभाजी या नावाने नाष्ट्याची हातगाडी आहे. पावभाजी, दाबेली विकून ते आपला उदरनिर्वाह करतात. मात्र त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकतेमुळे त्यांचे कौतुक होत आहे.
पावभाजी वाल्याने दाखविला प्रामाणिकपणा; दागिने, पैसे असेलेले बॅग केली परत - कैलास पावभाजी
नेहमीप्रमाणे त्यांच्या ठेल्यावर सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घोन्सा येथील एक महिला नाष्टा करण्यासाठी आली. नाष्टा केल्यानंतर त्या गडबडीत त्यांच्याजवळील बॅग तिथेच विसरली. बराच वेळ ती बॅग तेथेच पडून राहिली.
नेहमीप्रमाणे त्यांच्या ठेल्यावर सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घोन्सा येथील एक महिला नाष्टा करण्यासाठी आली. नाष्टा केल्यानंतर त्या गडबडीत त्यांच्याजवळील बॅग तिथेच विसली. बराच वेळ ती बॅग तिचेच पडून राहिली. नानूरामचे लक्ष बॅगेवर गेले. नानूरने बॅग उघडून पाहिली त्यामध्ये दागिने आणि रोख रक्कम होती. त्यांनी ती बॅग सांभाळू ठेवली. जेंव्हा त्या महिलेच्या लक्षात आले की, आपली दागिन्यांची बॅग कुठे तरी राहून गेली. ती महिला तिच्या पतीसोबत परत ठेल्यावर आली. बॅगेची ओळख पटवून ती बॅग नानूरा यांनी त्या महिलेला परत केली. प्रामाणिकतेचे हे उदाहरण नानूराम यांनी दाखवून दिले. त्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.