यवतमाळ- कोरोनाची लढाई लढण्यासाठी शासनाला अनेक सामाजिक संघटनांचे सहकार्य मिळत आहे. लोकप्रतिनिधी, उद्योजक, दानशुर व्यक्ती, नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना व इतरांकडून आर्थिक मदतीचा ओघही सुरू आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील अग्रगण्य हिराचंद रतनचंद मुणोत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कोरॊनाग्रस्तांना मदत म्हणून 11 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
यवतमाळच्या हिराचंद मुणोत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी 11 लाखांची मदत - yawatmal corona news
जिल्ह्यातील अग्रगण्य हिराचंद रतनचंद मुणोत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कोरॊनाग्रस्तांना मदत म्हणून 11 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
hirachand ratanchand munot charitable trust
ट्रस्टचे सचिव रमेश मुणोत यांनी राज्याचे वने, भूकंप पुनर्वसन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधिसाठी धनादेश प्रदान केला. याप्रसंगी मोहन गांधी उपस्थित होते. शासनाच्या वतीने जिल्हाधिकार्यांनी मुणॊत ट्रस्टचे आभार मानले.