यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव येथे रात्री अचानक लागलेल्या आगीत गुरांचा गोठा जळून खाक झाला. सुदैवाने यात गोठ्यातील कोणतेही जनावर दगावले नाही. मात्र, गोठ्यातील दोन बैल आणि एक गाय यांपैकी गाय गंभीर जखमी झाली. महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीच्या साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जनावरांच्या गोठ्याला लागली आग; आगीत गाय जखमी तर दोन लाखांचे नुकसान - यवतमाळ गोठा आग
मोरगाव तालुक्यातील कान्हाळगाव येथील शेतकरी सुभाष कोरडे यांचा रस्त्याला लागूनच गोठा आहे. रात्री अचानक लागलेल्या आगीने मोठा पेट घेतला. त्यात कोरडे यांच्या गोठ्यातील शेतीउपयोगी साहित्ये, अवजारे, तूर, कापूस, गोठ्याचे पत्रे आगीत भस्मसात झाले.
![जनावरांच्या गोठ्याला लागली आग; आगीत गाय जखमी तर दोन लाखांचे नुकसान herd of cow went on fire in yavatmal a cow was injured](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7178951-thumbnail-3x2-aa.jpg)
हेही वाचा...औरंगाबाद : देवगाव रंगारी येथील जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण
कान्हाळगाव येथील शेतकरी सुभाष कोरडे यांचा रस्त्याला लागूनच गोठा आहे. रात्री अचानक लागलेल्या आगीने मोठा पेट घेतला. त्यात कोरडे यांच्या गोठ्यातील शेतीउपयोगी साहित्ये, अवजारे, तूर, कापूस, गोठ्याचे पत्रे आगीत भस्मसात झाले. सुभाष कोरडे यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तेव्हा आग आटोक्यात आली. सुभाष कोरडे यांनी दिलेल्या माहितीवरून घटनास्थळी महसूल विभागाने पंचनामा केला आहे.