महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात अवकाळी पाऊस; शेतातील पिकांना बसला फटका - yavatmal

यवतमाळ जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस पडल्याने ज्वारी, तीळ, टरबूज या पिकांना फटका बसला आहे. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस
यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस

By

Published : Apr 11, 2021, 12:29 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस पडला. झरी तालुक्यात दुपारच्या वेळेस शिंदोला परिसरात चांगलाच पाऊस बरसला. परिसरात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. सध्या शेतात ज्वारी, तीळ, टरबूज या पिकांना फटका बसला आहे. आणि या अवकाळी पावसाचा फटका सर्वात जास्त भुईमूग आणि आंब्याला बसत आहे. या पावसाने ज्वारीचे कणसे काळी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतातील पिकांना बसला फटका
शेतकऱ्यांचा जीव टांगणीला....

अवकाळी पावसाच्या आगमनाने शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागला आहे. खरीप पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. त्यात रब्बी पिकांवर आणि उन्हाळी पिकांवर त्यांची भिस्त होती. ती अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणाने हिरावली गेली. आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चांगला अडचणीत सापडला आहे. बदलत्या हवामानाने हवेत गारवा पसरल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंतु याच हवामानाने संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती सुद्धा निर्माण झाली आहे.

अवकाळी पाऊस

ABOUT THE AUTHOR

...view details